Adhyatmik Suvichar Pics In Marathi

God Status Image In Marathi
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.

Mi Dev Manto Pan Mansat Rahnara
मी देव मानतो पण माणसात राहणारा.

Lakshat Theva Aapan Kon Aahat
लक्षात ठेवा आपण कोण आहात. कोणाशीही,
कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका.
तू सर्वशक्तिमान देवाचं मुल आहेस. ते सत्य जगा ..

Nirmiti Aani Vinash Jodalele Aahe
निर्मिती आणि विनाश जोडलेले आहे, जर एखादी गोष्ट मृत्यू पावली तर दुसरी गोष्ट जन्माला येते. आणि निर्मिती आणि नाश यांच्यातील प्रत्येक गोष्ट म्हणजे च आपला जीवन प्रवास.

Swatah Var Vishvas Asel Tar
देवावर विश्वास असेल तर, देव जे देईल त्याच्यात समाधान माना.
पण, स्वतःवर विश्वास असेल तर, देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल.

Dukhi Manasala Madat Karnysathi Lambavalela Ek Hath
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

Karma Che Fal
कर्माचे फळ
माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.

चांगले केलेले काम कधी वायाला जात नाही, आज जरी यश मिळाले नाही तरी ‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘ या निसर्गनियमानुसार भविष्यात ते न मिळालेले यश माणसाला दामदुपटीने मिळते.

एखादा माणूस आपले सुयश हिरावून घेतो म्हणजेच आपल्याला अपयश मिळते. ज्याअर्थी अपयश मिळाले त्या अर्थी ते अपयश निसर्गनियमानुसार आधी केलेल्या चुकांचे फळ असू शकते.

यशाचे कर्तृत्व माणूस स्वत:कडे घेतो, त्याचप्रमाणे अपयशाचे भोगतृत्वसुद्धा त्याच्याचकडे जाणे क्रमप्राप्त आहे.
म्हणूनच माणसाने अपयशाचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुका दुरुस्त करून यशाच्या दिशेने प्रयत्न करणे, हेच त्याच्या हिताचे होय.  प्रामाणिकपणे व कर्तव्यबुद्धीने काम करणे, हे सर्वार्थाने सर्वांच्याच हिताचे आहे.

‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘ म्हणजे ‘Low of Action and Reaction’ या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या राष्ट्रातील लोक कामात कसूर करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष घडवून आणणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही.

याउलट ज्या राष्ट्रांतील लोक कर्तव्यबुद्धीने, प्रामाणिकपणे काम करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष अटळ आहे.
– सद्गुरू श्री वामनराव पै

Jevha Mandirat Janarya Ranga
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.

Shraddhechi Mule Hrudayat Astat
श्रद्धेची मुळे हृदयात असतात,
जिभेच्या टोकावर नसतात.

Jo Aanandi Rahto

Marathi Suvichar On Helping Hand

नमस्काराचं महत्व…!!!

नमस्कारांत प्रेम आहे …
नमस्कारांत विनय आहे…
नमस्कारांत अनुशासन आहे…
नमस्कार आदर शिकवतो…
नमस्कारामुळं मनांत सुविचार येतात…
नमस्कारामुळं क्रोध नष्ट होतो…
नमस्कारामुळं अहंकार नष्ट होतो…
नमस्कारांत शीतलता आहे…
नमस्कार
अश्रू पुसण्याचं काम करतो …
नमस्कार आपली संस्कृती आहे,
ह्या संस्कृतीचं आपण
जतन केलं पाहिजे…!!!
🙏🏻सर्वांना नमस्कार🙏

Aadhyatmik Suvichar
“एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत, हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.”

Aadhyatmik Suvichar
“आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.”


“अपराध करून जो सुख मिळवतो त्याला देव कधीही क्षमा करत नाही.”


“अनेक गोष्टीवर प्रेम करा मग तुम्हाला परमेश्वर समजेल .”


“अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.”

Leave a comment

Subscribe

Loading