Motivational Suvichar Pictures In Marathi
परिस्थितीबद्दल काळजी करू नका, आपण जिथे आहात त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करा, प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत.
तुमच्या मध्ये सहनशक्ति दांडगी असेल पाहिजे
तरच तुम्ही ही जग जिंकू शकाल
जर ती नसेल तर हेच जग तुम्हाला हरवेल
काहीही झाले तरीही जिद्द सोडू नका
आपणच जिंकणार याच विचाराने कमाल सुरुवात करा.
प्रत्येकाच्या अंगी कोणती ना कोणती खुबी लपलेली असते. ती ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा. स्वतःताची ओळख करुन घ्या आणि आपल्या अंगी लपलेले चांगले गुण जगासमोर मांडा. खुप फायदा होईल.
पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो.
कठीण काळात सतत स्वःताला सांगा, की
‘शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.”
जेव्हा तुम्हाला सर्वकाही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते न की वाऱ्याच्या बरोबर.
स्वत: वर विश्वास ठेवणे हे यशाचे पहिले रहस्य आहे.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. ते अमेरिकेतील खूपच लोकप्रिय आणि यशस्वी राष्ट्राध्यक्ष होय. कोणालाही आज एवढंच दिसते पण त्या साठी त्यांनी किती अपयश पचवले आहेत हे कोणालाच माहिती नाही.
अब्राहम लिंकन यांची अपयशे
#31 व्या वर्षी ते Business मध्ये fail झाले
#32 व्या वर्षी ते state legislator चे निवडणुक हरले.
#33 व्या वर्षी त्यांनी नवे business try केलं, आणि परत त्यात fail झाले.
#35 व्या वर्षी त्यांचा प्रेयसीचे निधन झाले.
#36 व्या वर्षी त्यांचं nervous break-down झालं.
#43 व्या वर्षी त्यांनी अमेरिकन कांग्रेस साठी निवडणूक लढवल पण त्यातही त्यांचा पराभव झाला.
#48 व्या वर्षी त्यांनी परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून पुनप्रयत्न केला त्या वेळीही त्यांना पराभवच आला.
#55 व्या वर्षी त्यांनी Senate साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव.
#56 वर्षी त्यांनी अमेरिकेच्या Vice President पदासाठी निवडणूक लढवली आणि तेही हरले. या नंतर परत senate साठी झालेल्या निवडणूकीत देखील त्यांचा प्रभाव झाला.
मित्रांनो एवढे अपयश सहन करून सामान्य मानूस निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. पण अब्राहम लिंकन या असामान्य माणसाने परत एकदा प्रयत्न करायचे ठरवले. 1860 मध्ये झालेल्या अमेरिकन president पदा साठी त्यांनी पुन निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं. जवळपास 30 वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाचा 59 व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. आणि पुढे काय झालं याची साक्ष इतिहास देतो.
म्हणून नेहमी लक्षात ठेवा मित्रानो
मानले तर हार आहे आणि ठरवलं तर जित आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹☺
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
शुभ सकाळ मित्रानो!!!!!
🌹❤🌹🌹❤🌹❤🌹
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं…..।।।।।
“जीवनात एक क्षण रडवून जाईल
तर दुसरा क्षण हसवून जाईल…
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल……!
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.