Great People Thoughts In Marathi

Marathi Suvichar Of Sant Gnyaneshwar

Aacharya Vinoba Bhave Marathi Quotes

आचार्य विनोबा भावे यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो।

Quote 2. कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे।

Quote 3. जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही।

Quote 4. दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो।

Quote 5. परीश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे।

Quote 6. प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे।

Quote 7. प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे।

Quote 8. माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा।

Quote 9. यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे।

Quote 10. विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल।

Quote 11. विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार।

Quote 12. सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते।

Adolf Hitler Quotes in Marathi

Walt Disney quotes in marathi fonts

APJ Abdul Kalam Marathi Suvichar Quotes for facebook and whatsapp.

ऐ पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगण सोडुन द्या – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 2. मोठ काम करण्याचा एकच मार्ग आहे जे काम करत आहात ते प्रेमाने करा – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 3. इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 4. काय करायचे आहे हे ठरवणे हे जेवढे महत्वाचे आहे काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा तेवढे महत्वाचे आहे – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 5. कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही जगण्यातील आशा सोडू नका- ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 6. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 7. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो नक्कीच तुमचा दोष असेल – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 8. यशाचा आनंद घ्या पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 9. यश हा असा वाईट शिक्षक आहे जो यशस्वी माणसांना असा विचार करण्यास भाग पाडतो कि ते कधीच हारू शकत नाही – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 10. कोणाला हरवण सहज आहे पण कोणाला जिंकवण कठीण – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 11. तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल – ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 12. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत- ऐ पी जे अब्दुल कलाम
Quote 13. ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी, त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय.- ऐ पी जे अब्दुल कलाम

वीर सावरकर यांचे प्रेरणादायी विचार

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।

मात्र अमर होय ती वंशलता ।
निर्वंश जिचा देशाकरिता ।।

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा ,
मज भरतभूमिचा तारा ।।

प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसार्खेच आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिध्द आहेत.

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.

एक देव एक देश एक आशा ।।
एक जाती एक जीव एक आशा ।।

यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.
आपल्या प्रामाणिक पणाचा उपयोग होईल पण केव्हा ? तर दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच!

अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन!

स्वतः जगणे व राष्ट्र जगविणे हे आपले कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो”

Quote 2. “मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये”

Quote 3. “कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेऊन, मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे”

Quote 4. “मी स्त्री व्हावे कि पुरुष, काळा कि गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणे , हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे”

Quote 5. “हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही? वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल, हे हि नसे थोडके!”

Quote 6. “आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे”

Quote 7. “माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे”

Quote 8. “माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे”

Quote 9. “माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.”

Quote 10. “ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात”

संत गाडगे महाराज यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकावा.”
Quote 2. “आई बापची सेवा करा.”
Quote 3. “जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.”
Quote 4. “दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवू नका”
Quote 5. “दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.”
Quote 6. “दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.”
Quote 7. “धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके प्राणी बळी देवू नका.”
Quote 8. “माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.”
Quote 9. “माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.”
Quote 10. “विद्या शिका आणि गरिबाले विद्ये साठी मदत करा.”
Quote 11. “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.”
Quote 12. “शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.”
Quote 13. “सगळे साधू निघून गेले आहेत आता उरले आहेत ते फक्त चपाती चोर (ढोंगी)”
Quote 14. “हुंडा देऊन किंवा घेऊन लग्न करू नका.”

Leave a comment

Subscribe

Loading