Inspirational Thoughts In Marathi
काही मिळाले किंवा नाही मिळाले…
तो नशिबाचा खेळ आहे… पण,
प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल.
वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.
कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधी पण परत येत नाही.
असेच वेळेचे पण आहे.
एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा
आनंद लुटा… 🙂
“स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर वाहून जातील…
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल….!
हसरा चेहरा आपला रूबाब वाढवतो,
परंतु हसुन केलेले काम
आपली ओळख वाढवते…
“मी” आहे म्हणुन “सगळे” आहेत या ऐवजी
“सगळे” आहेत म्हणुन “मी” आहे
हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही.
मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
“कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.”
“कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.”
“आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”
“अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.”
“कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.
परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून
तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार
आणि स्वतःवर विश्वास ठेवा”