Great People Thoughts In Marathi
Tags: Smita Haldankar
चिंटी चावल ले चली…
चिंटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥
अर्थात :
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला दाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.’
पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
View More
आईने बनवले, बाबानी घडवले,
आईने शब्दांची ओळख करून दिली,
बाबानी शब्दांचा अर्थ समजावला,
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली,
आईने लढण्यासाठी शक्ती दिली,
बाबानी जिंकण्यासाठी नीती दिली,
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आले,
म्हणून तर आज माझी ओळख आहे…