Best Emotional Thoughts In Marathi
आदर असेल त्यांच्या बद्दल प्रेम असणे जरूरी नाही … परंतु जर प्रेम असेल तर … त्यांच्या बद्दल आदर असणे फार महत्वाचे आहे.
नाती सुद्धा तराजूत तुलायला लागली आहे.
प्रेम कमी, मतलबी जास्त चालायला लागली आहे.
नाती आता कौडी मोलाने विकू लागली आहे,
खरी कमी आणि मतलबी जास्त तोलू लागली आहे.
कुणाला मी पसंत आहे आणि कोण मला नापसंत करते या गोष्टी ची मला चिंता नाही.
माझ्याकडे आणखी महत्वाच्या गोष्टी करण्यासाठी आहेत. जर तुम्ही माझ्यावर प्रेम केले तर माझ तुमच्यावर प्रेम आहे. जर तुम्ही मला साथ दिली तर माझी तुम्हाला साथ आहे. जर तुम्ही माझा द्वेष करीत असाल तर मला काळजी नाही. आयुष्याची गाडी चालते की तुमच्याबरोबर किंवा तुमच्याशिवाय.
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.
त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका
जो तुमच्यावर विश्वास ठेवतो,
आणि त्या व्यक्तीवर
विश्वास ठेवू नका,
जो तुमच्याशी खोटे बोलतो.
प्रत्येक हृदयात काही वेदना असतें. केवळ अभिव्यक्तीचे मार्ग भिन्न असतात. काही जण त्यांच्या डोळ्यात लपवतात तर काही त्यांच्या हास्यात लपवतात.
“गरिब स्थितील समाधान हे खर्या श्रीमंतीचे लक्षण आहे.”
“कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका.. कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो”
“काळजाची प्रत्येक जखम भरून येते
कारण काळ दुःखावर
मायेची फुंकर घालत असतो.”
“आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.”
“कर्तव्याची दोरी मनाच्या पंतगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो.”
सच्चे मित्र जपा
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसले होते. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मैत्रीणींना टाळत होते, भेटी कमी झाल्या होत्या. नवर्या सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता…..
पन्हे पितांना वडील म्हणाले, अग मी सांगतो म्हणून ऐक, पण मैत्रीणींना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल…
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही अडल्ट होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण खऱ्या मैत्रीणी बदलल्या नाहीत. राजश्रीची राजीच राहिली, शोभेची शोभा झाली नाही, पल्लवीला पल्ली बोल्ल्याशिवाय करमत नै, मानसीला पूर्ण नावाने कधी आवाज दिला नै मनीच बरं आपलं, रेखा म्हणजेच रेखी आपली.. बेबी आकाराने विशाल झाली पण आमच्यासाठी छोटीशी बेबीच राहिली,
आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मेडल पोडीयमवर आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना ” अबे तू पागल है ” हे सांगायला कोणतेही दडपण नसते.
😊