Best Holi Images In Marathi


Category: Festivals

Happy Holi Marathi Wishes For Friend
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगूं जाते ते रंग निघुन जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. हैप्पी होळी.

Rang Panchami Marathi Wishes
वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची
वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Happy Rangapnchami Marathi Wishes For Friend
जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासाचे पाणी,
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो ….
कारण भिजत राहतात त्या आठवणी
हैप्पी होळी

Happy Holi Marathi Wishes
प्रेमाचा रंग उधळूदे नात्यां मध्ये
रंग आणो तुमच्या जीवनात खुशीची बहार
आनंदाने भरून निघो तुमचा होळीचा सण
हेप्पी होली!

Rang Panchami Marathi Wishes
वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी
रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी
प्रीतीची
वेल फुलली गातो आम्ही गाणी
चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Happy Holi Marathi Wishes Quote
तनामनावर उमटले आज रंगाचे तरंग
रंगपंचमी घेऊन आली आज विविधतेचा संग
उधळू मुक्त भावना आज रंगाच्या समवे
परसपरावर प्रीत जडावी, विसरु रुसवे फुगवे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy Holi Marathi Wishes For Love
रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग, सौख्याचे अक्षय तरंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…


प्रेम रंगाने भरा पिचकारी,
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
ह्या रंगाना माहित नाही ना जाती ना बोली
सर्वांना मुबारक हो हेप्पी होळी.


रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


रंग साठले मनी अंतरी
उधळु त्यांना नभी चला
आला आला रंगोतस्व हा आला

होळी सणाची माहिती

होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो.फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासूनपंचमी पर्यंत या ५-६ दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.

होळीचे महत्त्व :

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते.

होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते.नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात.

एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.

थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला.आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळी येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.

रंगपंचमी सणाची माहिती

फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात.

होळी, धुलीवंदन आणि नंतर येणारी रंगपंचमी. होळीची पार्श्वभुमी आपण सर्वजण जाणतोच. धुलीवंदन आणि रंगपंचमी (आजकाल दोन्हीचा अर्थ एकच) ची तर मजा काही औरच. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करुन देणारा सण. कडक उन्हामधे गारवा देणारे रंग (अर्थात हर्बल) पाण्याचे फुगे आणि थंडाई. लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरु असते आणि बालपणाचा खरा आनंद देणारा हा सण. मित्रमैत्रिणी नातेवाईक सर्वाशी जवळीक साधुन देणारा हा सण.


रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

More Entries

  • Holi Messages In Marathi
  • Navratri Best Message Image
  • Durga Puja Greeting Picture
  • Happy Dhantrayodashi Blessed Wish Photo
  • Shiv Jayanti Chya Manpurvak Shubhechha
  • Somvati Deep Amavasya 20 July Apollo 11 Day
  • Nag Panchami Chya Shubhechha

Leave a comment