Marathi Bhasha Din Pics In Marathi


Category: Occasion

प्रिय मित्रांनो जय महाराष्ट्र !!🌹😊
सर्वाना मराठी भाषा दिनाच्या ‘स्मिता नंदकुमार हळदणकर’ तरफे हार्दिक शुभेच्छा .♥

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्या जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. …. महाराष्ट्र मधे राहणारया प्रत्येक जाती धर्मातील लोकांची मराठी हि लोकबोली आहे.
म्हणून आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!♥

लाभले आम्हास भाग्य बोलतो #मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी

आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी||

येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी… रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी..
गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||
जय महाराष्ट्र !!🌹😊


कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात
वि. वा. शिरवाडकर
यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस
‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा
करण्यात येतो. ‘अमृतातेही
पैजा जिंकणाऱ्या’ मायमराठीचा
गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.


साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.


माझा शब्द,
माझे विचार,
माझा श्वास,
माझी स्फूर्ती,
माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…

बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी,

!! सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!

More Entries

  • Happy Mahaparinirvan Diwas Wonderful Wish Photo
  • Vishva Saksharta Diwas Image
  • Sarvana Jagtik Kutumb Dinachya Hardik Shubhechha
  • Hug Day Marathi Message Image
  • Lovely Happy Teddy Day Status Picture
  • Happy Republic Day Greeting Image
  • Tuzi Mazi Maitri Marathi Status

Leave a comment