देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा ,
तिरंगी आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा