Narak Chaturdashi Pics In Marathi
तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती
आणि समृद्धी लाभो हीच सदिच्छा.
नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा!
तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी
नशीब घेऊन येईल आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
छोटी दिवाळीच्या शुभेच्छा !!
नरक चतुर्दशीच्या निमित्ताने तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांभोवती
असलेली सर्व नकारात्मकता संपुष्टात येऊ दे.
तुम्हाला रूप चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा
देवी काली माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल
अशी आमची शुभ कामना.
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुम्हाला सर्व वाईटांवर विजय मिळो आणि हे वर्ष तुमच्यासाठी नशीब घेऊन येईल आणि तुमची
सर्व स्वप्ने पूर्ण करेल.
नरक चतुर्दशी शुभेच्छा !!
जसा श्री कृष्णाने नरकासुर चा नाश केला
त्याच प्रमाणे आपल्या जीवनातून दुखाचा नाश हो
नरक चतुर्दशी च्या शुभेच्छा
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
देवी काळी माता तुम्हास व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून वाचवेल अशी आमची शुभ कामना.
नरकचतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा
आज नरकचतुर्दशी!
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा!
अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो!
आपणांस स्वर्ग सुख नित्य लाभो !!!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो..
नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
नरक चतुर्दशी ची संपूर्ण माहिती
दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी येते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.
श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे .
पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. देव व मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा हजार उपवर पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला.
श्रीकृष्णाला ही बातमी समजताच सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन त्याने असुरावर हल्ला केला. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्ता केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, `आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. या प्रकारे कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.
त्यामुळे आश्वििन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ता चा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच नंदाने त्यास मंगलस्नान घातले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.