Merry Christmas Messages In Marathi

क्रिसमस मराठी शुभभकामना संदेश

या नाताळात
सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची
अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार,
सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची बहार
मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार!
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!

नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्‍या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

आला नाताळ सण,घेऊनी आनंद मनात,
सर्व चुकांची माफी मागितली मनात,
सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात,
मदत हाच धर्म, गाणे गावे सुरात.

सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे याच नाताळच्या शुभेच्छा

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला

प्रभूचा आशिष अवतरला,
नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या
प्रेमच प्रेम भरभरुनी

सारे रोजचेच तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, नाताळच्या शुभेच्छा

क्रिसमस मराठी सुविचार

ख्रिसमस स्पिरीट म्हणजे देण्याचं आणि माफ करण्याचं स्पिरीट होय.

ख्रिसमस तुम्हाला संधी देतं थांबून आपल्या आसपासच्या लोकांसोबत पुन्हा एकदा जगण्याची आणि आनंद लुटण्याची.

ख्रिसमसचा आनंद फक्त या महिन्यापुरता नसून वर्षभरासाठी आहे तो जतन करा.

आपल्या ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा.

या जगात शांतता कायम राहील जर आपण रोजच ख्रिसमससारखा आनंद वाटला.

ख्रिसमस म्हणजे जादूची कांडी आहे. जेव्हा सगळं जग अगदी सुंदर दिसू लागतं.

ज्यांच्या हृदयातच ख्रिसमस स्पिरीट नसेल त्यांना ते ख्रिसमस ट्री खालीही सापडणार नाही.

खरा ख्रिसमस तेव्हाच जेव्हा तुम्ही ज्यांना खरंच प्रेमाच्या प्रकाशाची गरज आहे, त्यांच्यासोबत तो साजरा कराल.

हा सण खरंच खास आहे, जेव्हा संपूर्ण जग प्रेमाच्या रंगात रंगून जातं.

ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.

मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा मित्रपरिवारासाठी

ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत. माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

प्रिय मित्रा माझ्यासोबत आयुष्यातील सुंदर काळ घालवल्याबद्दल धन्यवाद. तुला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. हा ख्रिसमसही एकमेकांसोबत साजर करूया. लेट्स पार्टी.

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

देवाकडे काय मागू तुझ्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो हीच माझी मागणी मेरी ख्रिसमस.

तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण ख्रिसमसला हमखास येते. आपण एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं. मेरी ख्रिसमस माझ्या मित्रा.

तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो. मेरी ख्रिसमस मित्रा.

ख्रिसमसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील चांगले क्षण आठवूया. जे मी आता मिस करतो. या ख्रिसमलाही एकच मागणं आहे. तुझा प्रत्येक ख्रिसमस आनंदी जावो.

तुझ्यासाठी विश करतो की, तुला या ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स, ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स. मेरी ख्रिसमस.

माझ्या मित्रा तुला ख्रिसमसच्या खूप शुभेच्छा आणि हॅपी न्यू ईयर.

कुटुंबाला द्या ख्रिसमसला
प्रेमपूर्ण शुभेच्छा

ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया.

आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

मला खूप आनंद झाला आहे की यंदाचा ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करत आहे. माझं कुटुंब म्हणजेच माझं जग आहे. या जगातच मला माझा आनंद नेहमी गवसला आहे आणि भविष्यातही गवसेल. मेरी ख्रिसमस माय स्वीट फॅमिली.

आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.

जरी मी ख्रिसमस कुठेही सेलिब्रेट केला तरी माझं मन नेहमीच माझ्या कुटुंबासोबत असेल. माझ्या प्रिय आईबाबा आणि भाऊ-बहिणींना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला खूपच मिस करतोय. मेरी ख्रिसमस.

ख्रिसमस तुम्हा सगळ्यांसोबत स्पेंड करणं हे माझं सर्वात मोठं ख्रिसमस गिफ्ट आहे. ख्रिसमस म्हणजे कुटुंब आणि कुटंबासोबत केलेली धमाल. मेरी ख्रिसमस.

व्हिटेंज ब्रंच, चर्चेस, कुटुंब, गिफ्ट्स, लाईट्स, ख्रिसमस ट्रीज आणि प्रेयर्स याचा आनंद पूरेपूर घेणं म्हणजे ख्रिसमस. तुम्हा सगळ्यांनाही हा आनंद मिळो. मेरी ख्रिसमस.

ख्रिसमस हा फक्त सेलिब्रेट करण्याचा काळ नसून आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचाही सण आहे. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या कुटुंबाशिवाय हा दिवस मी साजरा करूच शकत नाही. थँक्यू माय वंडरफुल फॅमिली. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.

सहकाऱ्यांना द्या ख्रिसमसला
प्रेमपूर्ण शुभेच्छा

आपण एकत्र काम करणं हे नेहमीच काहीतरी नवीन शिकण्यासारखं आणि मजा असते. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. सुट्टीतही कर धमाल मेरी ख्रिसमस.

वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

ऑफिसमध्ये काम करणं हे फक्त तुझ्यामुळे मजेशीर आणि आनंददायक आहे. मेरी ख्रिसमस.

ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. मेरी ख्रिसमस.

माझा पार्टनर आणि सहकारी असल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे काम करणं अगदी सोपं झालं आहे. हॅव अ ग्रेट ख्रिसमस माझ्या मित्रा आणि सहकारी.

ख्रिसमस आणि नववर्षात करूया धमाल. तुझी आणि माझी ऑफिसमधील जोडी आहे कमाल. मेरी ख्रिसमस तुला आणि तुझ्या कुटुंबाला.

तुला एवढं यश मिळो की तुझ्या आयुष्यातील आनंद वाढो. मेरी ख्रिसमस माझ्या प्रिय सहकाऱ्याला.

मला तुझ्याकडून खूप शिकायला मिळालं आहे आणि या सुट्टीच्या आधी मी तुला धन्यवाद देऊ इच्छितो. मेरी ख्रिसमस.

तुमच्यासारखा प्रोत्साहन देणारा बॉस मिळणं शक्य नाही. तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर.

तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस.

Leave a comment

Subscribe

Loading