Jyotirao Phule Jayanti Pics

Shikshana Che Janak Mahatma Jyotiba Phule

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
असे सांगणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम
‘शिवजयंती’ सुरु करणारे, महान क्रांतिकारक, उत्तक
उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते, ‘शिक्षण हे वाघिणीचे दुध
आहे, जो पिणार तोच गुरगुरणार, हे ठणकावून सांगणारे…’
शिवरायांवर पहिला सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे
शिवशाहीर, “क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले” यांची जयंती…
म. फुलेंच्या महान कार्याला मानाचा मनपूर्वक त्रिवार मुजरा…
महात्मा फुले जयंतीच्या सर्व बांधवाना मनपूर्वक
हार्दिक शुभेच्छा…!


खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


दुर्लक्षित समाजासाठी लढणारे
एक असामान्य व्यक्तिमत्व.
केवळ आपल्या कर्माने ज्यांनी
महात्मा हि पदवी मिळवली असे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
Quote 2. “कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
Quote 3. “दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.”
Quote 4. “देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.”
Quote 5. “मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.”
Quote 6. “मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही.”
Quote 7. “मासा पाण्यात खेळतो त्याला गुरूची आवश्यकता नसते.”
Quote 8. “मूर्तीपूजा करू नका.”
Quote 9. “सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.”
Quote 10. “स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.”
Quote 11. “स्व कष्टाने पोट भरा.”
Quote 12. “स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.”
Quote 13. “सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही परंतु शांती‚सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती‚सुख मिळणार नाही, हे निश्चित.”

Leave a comment

Subscribe

Loading