Household Tips For Fever

ताप आल्यास घरगुती उपाय

“1) ताप १०४ डिग्री फॅ. च्या वर गेला असेल किंवा
कमी तापात देखील मूल अस्वस्थ असेल तर नळाचे पाणी घेऊन त्याने स्पंजिंग करावे. जर खूप थंड पाणी वापरले तर त्याने थंडी भरुन येईलआणि ताप कमी होण्यास मदत होणार नाही.

2) शरीरातील जास्त उष्णता खेचून घेणे हा स्पंजिंगचा फायदा आहे. मुलाला पंखा सुरु ठेवून थंड ठिकाणी ठेवावे. त्याचे कपडे काढून नळाच्या पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्यावा आणि मुलाच्या शरीराभोवती गुंडाळावा. टॉवेल गरम किंवा उबदार झाला की काढून घ्यावा आणि ताप कमी होईपर्यंत हे सारखे करावे.

3) स्पंजिंग केल्याने सर्दी होते हा एक गैरसमज आहे. काही प्रमाणात तो खरही आहे पण जास्त तापाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी झाली तर ती सहजपणे कमी करता येते.”

Leave a comment

Subscribe

Loading