Health Fruit Tips In Marathi
पपई खाण्याचे फायदे
” 1) मलेरिया, डेंग्यू या सारख्या आजारांमुळे रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात. नियमित औषधोपचाराबरोबरच डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देत आहेत.
2) मलेरिया आणि डेंग्यू या आजारामुळे रक्तातील प्लेटलेट कमी होऊन थकवा वाढतो. पपई खाल्ल्याने शरीरातील पाढऱ्या पेशींमध्ये वाढ होते. यामुळे डॉक्टर रुग्णांना पपई खाण्याचा सल्ला देत आहेत. ”
अंजीर खाण्याचे फायदे
” 1) अंजीर शक्तिवर्धक असून पचनास जड पण शीतदायी आहे.
2) सुक्या अंजिरामधील लोहामुळे आपले शरीर आणि जठर क्रियाशील बनते, परिणामत: भूक लागते.
3) अंजीर पित्तविकार, वायुविकार आणि रक्तविकार दूर करते.
4) अंजिराच्या रोजच्या सेवनाने मलावरोध नाहीसा होतो.
5) अंजीर सकाळ-संध्याकाळ दुधात गरम करून खाल्ल्याने कफाचे प्रमाण कमी होते तसेच दम्याचा विकार नाहीसा होतो.
6) शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठीही अंजीर उपयोगी पडते.
7) घरामध्ये लहान बालकाने चुकून काचेचा तुकडा गिळला तर तत्काळ अंजिरे खाऊ घालावी. या उपायाने काचेचा तुकडा गुदद्वारावाटे बाहेर पडतो.
8) अंजीर हृदयरोगावरही गुणकारी आहे. बहुगुणी अंजीर उपयुक्त आहे तसेच ते पचनास जडही आहे. त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात दुखणे सुरू होते. म्हणून अंजीर खाताना योग्य प्रमाण लक्षात घ्यावे.
9) जास्त पिकलेले अंजीर खाणे आरोग्यासाठी बाधक ठरते. ”
डाळिंब खाण्याचे फायदे
” डाळिंब खाण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. कारण त्याला सोला व त्यातील दाणे काढा, मग ते खा. त्यापेक्षा आपल्याला इतर फळे खायला आवडतात. मात्र, हे कंटाळवाणे डाळिंब आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असते, हे क्वचितच लोकांना माहीत असते. तर चला बघू या या डाळिंबाचे फायदे.डाळिंबाला आयुर्वेद शास्त्रात खूप महत्त्व आहे. हे सर्वात जुने व सर्वांना माहीत असलेले फळ आहे.
1) रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण असे रसदार फळ म्हणूनही डाळिंबाला ओळखले जाते.
2) यामध्ये व्हिटामिन्स ए, सी,ई बरोबरच फ्लोरिक अँसिड या रसायनिक घटकाबरोबरच अँटि ऑक्सिडंट मोठय़ा प्रमाणात आहे.
3) फुप्फुस, यकृत, हृदय या रोगांवर उपयुक्त आहे.
4) पोटांचे आजारही डाळिंबामुळे बरे होतात.
5) डाळिंबाचा प्रत्येक भाग शरीरासाठी फायदेशीर ठरणारा आहे.
6) वाळलेल्या डाळिंबाची पावडर दररोज पाण्यात टाकून प्यायल्यास लघवीला त्रास होत नाही.
7) खोकला येत असेल तर डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खोकल्याची उबळ येत नाही.
8) डाळिंबाची साल उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी जाते.
9) मासिक पाळीच्या वेळेला जास्त रक्तस्राव होत असल्यास डाळिंबाची साल पेस्ट करून पाण्यामध्ये घेतल्यानंतर रक्तस्राव कमी होतो.
10) डाळिंबाची पेस्ट व दह्याचे मिश्रण करून केसाला लावल्यास केस गळणे थांबते व केस मुलायम होतात.
11) कोलेस्टेरॉल किंवा हृदयाच्या आजारासाठी डाळिंब खाणे फायदेशीर असते.
12) वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑक्सिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.
13) कॉलरासारख्या आजारावर डाळिंबाचा ज्यूस उपयुक्त ठरतो. शुगर असलेल्या व्यक्तीने डाळिंबाचा ज्यूस प्यायल्यास कोरोनरी नावाच्या आजारापासून बचाव होतो.
14) डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचनसंस्थेतील अडचणी दूर होतात “