Children’s Day Images In Marathi
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
लहान पणी सगळेच विचारायचे तुला काय व्हायचंय?
पण उत्तर कधी सापडलेच नाही..
आज जर कोणी विचारले ना तर उत्तर एकच असेल,
मला पुन्हा लहान व्हायचंय…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका,
हसा, रडा, पळा, धडपडा, उडया मारा, खेळा,
उगीचच मोठे झालो हे मनावर ओढवून
घेतलेले बंधन झुंगारून द्या..
लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे,
आपण जगासाठी नाही..
शाळेतल्या दप्तरासारखे अख्ख्या जगाचे ओझे
आपल्याच पाठीवर आहे असे वागू नका..
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
मित्रांचा सहारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मन हे वेडे होते,
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो,
कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत,
या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते…
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आपण आपल्या इच्छेनुसार
आपल्या मुलांना घडवू शकत नाही
आपण त्यांना त्याच रुपात स्वीकारुया
व प्रेम देऊया ज्या रुपात
देवाने त्यांना आपल्यास दिले आहेत.
हैप्पी बाल दिन !!