Bhagwan Shri Datta Guru Wishes In Marathi
भगवान श्रीदत्तात्रेयांचे २४ गुरु
श्री दत्तात्रेय प्रभू महाराज यांनी आपल्या जीवनात जे २४ गुरु केले होते
१. पृथ्वी =
धैर्य व क्षमा यांचा संस्कार घ्यावा.
२. प्राणवायू =
जेवढा आहार आवश्यक तेवढाच घ्यावा.
३. आकाश =
प्रत्येक परिस्थितीत निर्विकार राहावे.
४. जल =
स्वभावाने शुध्द, स्निग्ध, मधूर व लोकपावन व्हावे.
५. अग्नि =
तेजस्वी, ज्योतीर्मय, निर्लिप्त, कुठे प्रकट व कुठे अप्रकट राहून लोककल्याण करावे.
६. चंद्र =
काळाचा प्रभाव स्वतःवर न होऊ देणे.
७. सूर्य =
समयानुकूल उपभोग व त्याग करणे, अनासक्त परोपकारी असणे.
८. कबूतर =
कबूतराप्रमाणे आपले स्वातंत्र्य हरवून दयनीय बनणे. त्यासाठी कुणाशी अतिरिक्त स्नेह व आसक्ति न ठेवणे.
९. अजगर =
जे मिळेल त्यात जीवन निर्वाह करणे.
१०. समुद्र =
साधकाला समुद्राप्रमाणे प्रसन्न, गंभीर, खोल, अपार, अमर्यादित राहता आले पाहिजे. सुख-दुःखात एकच मानसिकता असली पाहिजे.
११. पतंग =
मोहामुळे विनाश होतो. म्हणून मोहापासून लांब राहणे.
१२. मधमाशी =
लहानथोरापासून ज्ञानाचे सारकण गोळा करणे.
१३. हत्ती =
माणसाने आप्त स्वकियांच्या मोहापासून, भ्रमापासून स्वतःला दूर केले पाहिजे.
१४. मध गोळा करणारा =
मोठ्या कष्टाने धन संचयन करून त्याचा उपभॊग नघेणार्या माणसासारखे दुःख देणार्या मोहामाद्गे राहू नये.
१५. हरिण =
वासना जागवणारे संगीत, नृत्य, वचन ऐकू नये.
१६. मासा = स्वादाच्या लोभाने प्राण घालवू नये.
१७. पिंगला वेश्या =
वाईट कामातून पश्चातापाच्या व्दारे सत्कर्माला प्रवृत्त होणे.
१८. कुरर पक्षी =
संचित धनाचा त्याग करून, योग्य वेळी सावध होऊन सुख प्राप्त करणे.
१९. बालक =
भोळेपणा, निष्पापता, चिंतारहितता.
२०. कुमारिका =
आवश्यक तेथे एकांत व स्वतःला प्रकट न करता राहणे.
२१. बाण तयार करणारा =
एकाग्रता व सतत ईश्वर चिंतनात मग्न असणे.
२२. सर्प =
विरक्त माणसाने स्वतःसाठी घर बनवू नये.
२३. कोळी =
ईश्वर ही सृष्टी स्वतःच रचतो व स्वतःच तीचा विणाश करतो.
२४. भुंगा =
भगवंताचे स्मरण करता करता स्वतःच आनंदरूप भगवान बनून —
टिप-काही चूक असल्यास मायपणा करून माफ़ी करावी दंडवत प्रणाम.
दत्त दत्त दत्ताची गाय ;
गायच दुध , दुधाची साय ;
सायच दही , दह्याच ताक ;
ताकाच लोणी , लोण्याच तुप ;
तुपाची धार :
दत्त दत्त दत्ताची गाय ;
!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!