Awesome Ram Navami Photos In Marathi

Happy Ram Navami Wish In Marathi
अयोध्या चे वासी राम
रघुकुल चे म्हणतात राम
पुरुषां मध्ये उत्तम राम
नेहमी जपा हरी रामाचं नाव
हैप्पी राम नवमी

Ram Navami Marathi Hardik Shubhechha
क्रोधला ज्यानं जिंकले आहे,
ज्यांची भार्या सीता आहे,‌ जे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण चे भ्राता आहे,
ज्यांच्या चरणी आहे हनुमंत बाळ,
ते पुरुषोत्तम राम आहे, भक्तात ज्यांचे प्राण आहे,
असे मर्यादा पुरुषोत्तम रामाला कोटि कोटि प्रणाम आहे.

Shubh Sakal Shri Ram Navami Chya Hardik Shubhechha
शुभ सकाळ शुभ दिवस
श्री राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami Chya Aapnas Hardik Shubhechha
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
त्यांचे नाव श्री राम आहे,
मर्यादा पुरषोतम तो राम आहे,
त्यांच्या चरणी माझा प्रणाम आहे,
राम नवमी च्या आपणास
हार्दिक शुभेच्छा

Aata Bola Mukhane Hari Nam Jai Jai Ram

“आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम “
आता बोला मुखाने हरि नाम जय जय राम
आता बोला मुखाने जय जय राम, जय जय राम जय जय राम
आता तरी बोला मुखाने जय जय राम || धृ ||
राम नामाने वाल्या कोळी तरला, वाल्याचा वाल्मीकी झाला
ऐसे हरिनामाचे काम…. जय जय || १ ||
राम नामाने अघटित घडले, पाण्यावरती पाषाण तरले
ऐसे हरिनामाचे काम…… जय जय || २ ||
एकाजनार्दनी राम नाम, उद्धरिले भाविकात
ऐसे हरिनामाचे काम ….. जय जय || ३ ||

|| श्री रामरक्षा स्तोत्र ||

श्रीगणेशाय नमः

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य ।
बुधकौशिकऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता ।
अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः ।
श्रीमद्धनुमान् कीलकम् ।
श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे जपेविनियोगः ।
अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानबाहुं धृतशरधनुषंबद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानंनवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारुढसीतामुखकमलमिलल्लोचनंनीरदाभं ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनंरामचंद्रम् ॥
इति ध्यानम् ।

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामंराजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्॥२॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्।
स्वलीलया जगत् त्रातुम् आविर्भूतमजंविभुम् ॥३॥

रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नींसर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥

कौसल्येयो दृशौ पातुविश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखंसौमित्रिवत्सलः ॥५॥

जिव्हां विद्यानिधिःपातु कण्ठंभरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधःपातु भुजौभग्नेशकार्मुकः ॥६॥

करौ सीतापतिःपातु हृदयंजामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिंजाम्बवदाश्रयः ॥७॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनीहनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥

जानुनी सेतुकृत् पातु जङ्घेदशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलंवपुः ॥९॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृतीपठेत् ।
सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयीभवेत् ॥१०॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितंरामनामभिः ॥११॥

रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वास्मरन् ।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिंमुक्तिं च विन्दति ॥१२॥

जगज्जेत्रैकमन्त्रेणरामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्था सर्वसिध्दयः ॥१३॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्॥१४॥

आदिष्टवान् यथा स्वप्नेरामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुध्दोबुधकौशिकः ॥१५॥

आरामः कल्पवृक्षाणां विरामःसकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः ॥१६॥

तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौचीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौरामलक्ष्मणौ ॥१८॥

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौसर्वधनुष्मताम् ।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नौरघूत्तमौ ॥१९॥

आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथिसदैव गच्छताम् ॥२०॥

संनद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयोरघुत्तमः ॥२२॥

वेदान्तवेद्यो यज्ञेशःपुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥

इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तःश्रध्दयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति नसंशयः ॥२४॥

रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षंपीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न तेसंसारिणो नरः ॥२५॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिंसुंदरम्
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिंविप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयंश्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवंरावणारिम् ॥२६॥

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥

श्रीराम राम रघुनंदन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥

श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥

माता रामो मत्पिता रामचंद्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः ।
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यंजाने नैव जाने न जाने ॥३०॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वंदेरघुनंदनम् ॥३१॥

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रंरघुवंशनाथम् ।
कारुण्यरुपं करुणाकरं तंश्रीरामचंद्र शरणं प्रपद्ये ॥३२॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियंबुध्दिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतंशरणं प्रपद्ये ॥३३॥

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयोनमाम्यहम् ॥३५॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् ।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशंभजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मैनमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्यदासोऽस्महं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राममामुध्दर ॥३७॥

रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

इति श्रीबुधकौशिकविरचितंश्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम् ।
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

।।श्रीरामची आरती।।

श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

श्रीराम जयराम जय जय राम

श्रीराम जयराम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ।
मारुती हा पुढे उभा हात जोडून ॥ १ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
लक्षुमणाने सेवा केली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
आता मागणे हेची ।
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥
राम ।
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

रामनवमी सणाची माहिती

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे.
या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या रामाचा जन्म झाला.
हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात.
त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२.०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. रामाची पूजा करताना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात.
श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.
रामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रम ही केले जातात. श्रीराम ही सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

Leave a comment

Subscribe

Loading