Amazing Dhantrayodashi Images In Marathi

Happy Dhantrayodashi Blessed Wish Photo
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

Blessed Dhantrayodashi Message Photo
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो,
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो.
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा

Dhantrayodashi Best Wishing Image
आज धनत्रयोदशी!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो..
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dhanteras Greeting Pic
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

Shubh Dhanteras Status Photo
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे,
यश आपणास प्रत्येक जागी मिळो.
हॅप्पी धनतेरस
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी
सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी!
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा
धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी
रांगोळी, फटाके आणि
फराळाची तर मजाच न्यारी
चला साजरी करूया
दिवाळी आली रे आली
दीपावली व धनत्रयोदशी च्या शुभेच्छा!!
आज धनत्रयोदशी
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणांस आणि आपल्या कुटुंबास
आनंदाची आणि !!भरभराटीची जाओ
धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे.
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतो. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
धन्वंतरि जयंती
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.