Wonderful Laxmi Poojan Pictures
आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे…
धनलक्ष्मी,
धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी…
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !
लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो !
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा
लक्ष्मीपूजन ची संपूर्ण माहिती
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?
आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतीमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायूमंडलात गतीमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायूमंडलात गतीमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकले जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून रहाते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी निःसारण, म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात.
या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.
व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदुळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.
या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.