Aajibai Cha Batwa Tips In Marathi
लवंग चे आरोग्यवर्धक फायदे
1) लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मि. ली. पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसांतून 3 वेळा घ्यावा त्याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो
2) दाताच्या दुखण्यातसुद्धा लवंग गुणकारी असते, यात असलेले एंटिसेप्टिक गुण दातांमध्ये संक्रमणाला कमी करतात.
3) दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकं दुखी थांबते.
4) डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.
सागरगोटा चे आरोग्यवर्धक फायदे
1) औषधात सागरगोट्याचे बी व पाने वापरली जातात.
2) मधुमेह, पोटदुखी, जंत, गर्भाशयाची सूज वगैरे विकारांमध्ये सागरगोट्याची बी वापरली जाते.
3) लहान मुलांच्या बाळगुटीत सागरगोटा असतो.
4) वायूने पाट फुगते, दुखते त्यावर सागरगोटा भाजून, आतला मगज काढून, त्यात समभाग काळे मीठ टाकून घेण्याचा उपयोग होतो.
5) सुजेवर सागरगोटा उगाळून लेप लावल्यास सूज कमी होते.
शतावरी चे आरोग्यवर्धक फायदे
1) शतावरीच्या ताज्या मुळ्यांचा रस लघवी साफ होण्यास उत्तम असतो.
2) लघवी होताना आग होत असल्यास किंवा लघवी थांबून थांबून होत असल्यास शतावरीचा रस दुधासह घेता येतो.
3) शतावरीचा काढा करून घेणेसुद्धा ताकद वाढण्यासाठी, बुद्धी – स्मृती व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगी असते. ”
अश्वगंधा चे आरोग्यवर्धक फायदे
1) अश्वगंधाचे मूळ वातरोगांमध्ये, तसेच शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असते.
2) शुक्राणू कमी असणे, सांधेदुखी, अशक्तता, मांसक्षय, रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
3) वजन वाढण्यासाठी, विशेषतः मांसधातूचे पोषण होण्यासाठी अश्वगंधा मुळाचे चूर्ण तूप-साखरेसह किंवा लोणी-साखरेसह घेता येते.
4) अश्वगंधा क्षीरपाक म्हणजे अश्वगंधा, दूध वा पाणी एकत्र उकळवून तयार केलेले सिद्ध दूधसुद्धा मांसधातू, शुक्रधातूच्या पोषणासाठी उत्तम असते.
अडुळसा चे आरोग्यवर्धक फायदे
1) अडुळशाची पिकलेली पाने औषधात वापरली जातात.
2) पाने व फुलांत “व्हॅसिनीन’ नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य सर्व प्रकारच्या खोकल्यावर, घशाच्या आजारांवर, दम्यावर उपयोगी असते.
3) खोकल्यासाठीच्या सिरपमध्ये अडुळसा असतोच.
4) कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमचाभर रस मधासह घेतल्यास आराम मिळतो.
5) अडुळशाच्या पिकलेल्या पानांचा काढा कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी असतो.
गोकर्णी चे आरोग्यवर्धक फायदे
1) डोकेदुखी:-
गोकर्णीच्या शेंगचा 8 ते 10 थेंब रस सेवन किंवा मुळाच्या रसाचे सेवन रोज अंशीपोटी सूर्योनयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्यानेही कान दुखी थांबते.
2) आर्ध सी सी:-
गोकर्णीच्या बियांची 4-4 थेंब रस काढून नाकात टाकल्यास आधा सी सी दूर होते.
गोकर्णीच्या बिया या थंड व विषयुक्त आहे. या बिया व मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्यासोबत सेवन केल्यास आर्ध सी सी दुर होते.
3) कासश्वास:
गोकर्णीच्या मुळांचा काढा तयार करून त्याचे चाटण दोन वेळा घेतल्यास कास, श्वास तसेच लहान मुलांचा डांग्या खोकल्यास लाभदायी होते.
4) गलगंड:-
पांढर्या रंगाच्या गोकर्णीच्या मुळांच्या दोन ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास तसेच कडून फळांच्या चुर्णास गळ्यात आतल्याभागास घासल्यास गलगंड हा आजार बरा होतो.
5) टॉंसिल:
10 ग्रॅम पत्र, 500 ग्रॅम पाणी मिसळू अर्धे मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ, संध्याकाळ घातल्यास, गळ्यातील व्रण तसेच आवाज कंप पावल्यास फायदा होतो.
6) जलोदर:
1) लहान मुलांना होणारा जलोदर गोकर्णीच्या भाजलेल्या बिय 1/2 ग्रॅम चुणे कमीत कमी दिवसातून दोन वेळा सेवन केल्यास फायदा होतो.
2) कामला अर्थात गोकर्णी मुळांचे 3-6 ग्रॅम चुर्ण दही- ताकासोबत सेवन केल्यास लाभ होतो.
ओवा चे आरोग्यवर्धक फायदे
1) आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
2) वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.
3) ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा.
4) कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.
5) छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो.
6) दात दुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो. दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे.
7) पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
8) तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो.
9) ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.
10) पोटाशीच्याबाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो.
11) ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅलसिडीटीपासून सुटका होते.
12) आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम.
13) पोटात मुरडा होऊन कळ येत असेल तर ओवा चमचाभर घेऊन त्यात थोडे मीठ घालून गरम पाण्याबरोबर प्यावे.
14) तान्ह्या बाळाचे पोट दुखत असेल तर आपण ओवा पूड खाऊन बेंबीवर व तोंडात फुंकर मारावी.
15) भजी करताना त्यात ओवा पूड घालावी.
16) कफ सुटतो, ओकांरी थांबते, आव थांबते.
गुडवेल चे आरोग्यवर्धक फायदे
1) आयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पाने ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानांत कॅल्शिअम प्रोटिन फॉस्फरस आढळते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे.
2) ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण आहे.
3) गहू अथवा ज्वारीच्या रसासोबत तसेच तुळशीच्या पानांच्या रसासोबत किंवा कडुलिंबाच्या पानांसोबत गुडवेल सेवन केल्याने कर्करोगासारखे आजार बरे होतात.
4) टायफॉईड, मलेरिया डेंग्यू, उलटी, चक्कर येणे, खोकला, कावीळ, अँलर्जी आदी रोगांवर गुडवेल औषधी आहे.
5) कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी गुडवेल फायदेशीर ठरते.
6) अशा प्रकारे तुम्ही खूप सार्या आजारांवर हे गुडवेल वापरू शकता म्हणून आयुर्वेदिक शास्त्रात यालाही जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
7) कावीळ, मधुमेह, ताप, अशक्तता, संधिवात वगैरे अनेक रोगांमध्ये गुळवेल वापरली जाते.
8) थंडी-ताप, हाडात मुरलेला ताप, तसेच पुन्हा पुन्हा ताप येत असल्यास गुळवेलीच्या चार – पाच सें.मी. तुकड्याचा काढा करून घेण्याचा उपयोग होतो. संधिवात, आमवात वगैरे वातविकारांवरही गुळवेल व सुंठीचा काढा करून घेणे चांगले असते.
मेंदी चे आरोग्यवर्धक फायदे
1) आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो.
2) मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी महत्त्वही आहे.
3) मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्व आहेत.
4) मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.
5) मेंदीच्या सालीच्या काढय़ाने मुतखडा दूर करता येतो.
6) मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.
7) मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे.
8) घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात.
9) पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.
10) मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो.
11) मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेंदीतेल म्हणतात.
निलगिरी चे आरोग्यवर्धक फायदे
“1) निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
2) संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.
3) भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो.
4) श्वासनलिकाचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे.
5) नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत.
6) खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते.
7) निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो.
8) श्वासनलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते.
9) पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात”
कडूलिंबा चे आरोग्यवर्धक फायदे
“1) खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडूलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी.
पू तयार होणे थांबते.
2) कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्यास कालांतराने कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही असे म्हणतात.
3) पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते.
4) गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.
5) खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.
6) कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.
7) कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.
8) मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.
9) कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.
10) पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.”
कोरफड आरोग्यवर्धक फायदे
“1) लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते.
2) कोरफडीची पाने विस्तवावर थोडी गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो.
3) यकृताचे विकार, पाळीचे विकार, सूज, रक्तातील अशुद्धी, मूळव्याध वगैरे विकारांमध्ये कोरफड वापरली जाते.
4) कोरफडीचा एक ते दिड चमचा रस साखर घालून नियमितपणे घेतल्यास शरीरात चांगली शक्ती होते.
5) रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तसस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.
6) दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागत नाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.
7) पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, चेहर्याेच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.
8) कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत.
9) यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
10) कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
11) संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.”
*आयुर्वेदीय कविता*
खोकून खोकून कोरडा झाला जर का *घसा।*
मधातून चाटा *हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा।।*
लागला मुका मार, सुजून पाय झाला असेल *गारद।*
लेपासाठी उगाळा *तुरटी, रक्त चंदन, आंबेहळद।।*
कोंड्याचा झाला आहे कां डोक्यामधे *साठा?*
केस धुतांना लावा *मेंदी, शिकेकाई, रिठा।।*
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही *वंदन।*
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा *चंदन।।*
उन्हामधे रापून चेहरा झाला कां सावळा *गडद?*
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी *हळद।।*
बारीक आहे कुडी म्हणून होऊं नको तू *बावरी।*
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी *शतावरी।।*
पिकला एक केस होईल डोक्यावर *चांदी।*
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा *मेंदी।।*
केसांना लावा *कचूर सुगंधी, मेंदी, जास्वंद।*
केस होतील लांब सडक, *सुगंध दरवळेल मंद ।।*
गाणं म्हणण्यासाठी झालां आहांत तुम्ही *अधीर।*
गोड मधुर आवाजासाठी खा *ज्येष्ठमध, शंगीर।।*
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का *सांधा?*
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या *अश्वगंधा।।*
पित्तप्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कां *कळा?*
पोटात घ्या *आवळा, हिरडा, बेहडा म्हणजेच त्रिफळा।।*
वातामुळे पोटामध्ये होत आहेत कां *वेदना?*
खा *ओवा, सैंधव मीठ, आलं, लिंबू पुदिना।।*
संगणकावर काम करून थकली आहे कां *नजर?*
डोळ्यांसाठी खावे चांगले *पपई आणि गाजर।।*
लहान वयामध्येच ढोल मटोल झाला कां तुमचा *बेटा?*
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा *बटाटा।।*
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता *कळस।*
शुद्ध हवेसाठी झाडे लावा *कडूनिंब आणि तुळस।।*
छोटे छोटे आजार, बरं कां, घरच्या घरीच *हटवा।*
प्रत्येकाच्या घरी असूद्या *आजीबाईचा बटवा।।*
एरंड चे आरोग्यवर्धक फायदे
“1) एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वात उपयुक्त असे हे एरंडेल.तिखट, उष्ण, प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो.
2) एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे त्यामुळे कावीळ होत नाही.
3) भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटते, अपचन झाले, पोटात दुखत असेल अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादे लोण व सुंठीची पूड घालून चार सत्पके द्यावा.
4) कंबर दुखत असेल, खाली वाकता येत नसेल, चमक मारत असेल अशा वेळी वेली एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढय़ामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा याने कंबरदुखी थांबते.
5) हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी एक कप ताजे गोमुत्र घ्या. त्यात दोन तोळे एरंडेल तेल घाला व दररोज प्या त्यामुळे जुलाब होऊन पोट साफ होईल.
6) कावीळसाठी सर्वात गुणकारी व उपयुक्त असे हे एरंडेला आहे त्यामुळे कशाप्रकारची पण कावीळ असो, लवकर बरी होते, तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणी एरंडेलचा वापर.
7) एरंडमूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
8) एरंडेल तेल तर कोठा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहेच.
9) एरंडाची पानेसुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशामक उपचारांसाठी वापरली जातात;
10) तसेच यकृताची कार्यक्षमता वाढविण्यासाठीसुद्धा उपयोगी असतात.”
गवती चहा चे आरोग्यवर्धक फायदे
“1) आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे.
2) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल.
3) गवती चहाला पातीचा चहा असेदेखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे.
4) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.
5) तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.
6) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालीश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते.
7) गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.”
तुळस चे आरोग्यवर्धक फायदे
1) तुळस म्हणजे पवित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे रानातली हि तुळस परंतु तिच्या गुणांमुळेच तिला अंगणात जागा दिली जाते .
2) आपल्या देशात तुळशीला एवढे महत्त्व आहे कि ज्याच्या मुळे रोज तुळशीला पाणी घालणे ,पूजा करणे,प्रदक्षिणा घालणे अशा प्रकारे स्त्रिया रोजच तिची उपासना करतात . तसेच पुराणात देखील बराचसा उल्लेख केला आहे .
3) आयुर्वेदात तुळशीला फारच महत्त्वाचे स्थान आहे जसे अनशेपोटी तुळशीची २-३ पणे खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते ,शक्ती वृद्धिंगत होते ..दम ,खोकला ,कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात .
4) तुळशीची पाने हि सर्वात नैसर्गिक व उत्तम औषध आहे व त्यासारखे दुसरे औषध नाही. कित्येक मोठ्या आजारांवरदेखील तुळशीपासून तयार केलेले औषध दिले जाते .”